केशरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय त्वरित लागू करावा


केशरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय त्वरित लागू करावा - आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : कोरोना विषाणूच्या वाढल्या प्रादुर्भावाच्य पार्श्वभूमीवर राज्यात गरीब गरजू नागरिकांना अनेक अडचणीच्या सामना करावा लागत आहे.   राज्यात केशरी शिधापत्रिका धारकांना 8 रु किलो दराने गहु व 12 रु किलो दराने तांदूळ   
प्रति व्यक्ति गहु व तांदूळ 5 किलो या प्रमाणे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र हा  निर्णय 1 मे पासून अमलात आणण्याचे  शासनाने ठरवले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर या निर्णयाचा फायदा नागरिकांना होणार नसल्यामुळे या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गरीब गरजु नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, लॉकडाउन कधी पर्यन्त संपेल हे आताच सांगता येणार नाही.त्यामुळे राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना 8 रु किलो दराने गहु व 12 रु किलो दराने तांदूळ   प्रति व्यक्ति गहु व तांदूळ 5 किलो या प्रमाणे देण्याचा निर्णय 1 मे पासून लागू करणे संयुक्तिक ठरणार नाही. हा निर्णय घेण्या मागील मूळ उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने हा निर्णय त्वरित लागू करावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments