जिल्ह्यातील उद्योगाद्वारे सी.एस. आर फंडातुन गरजुना किटचे वितरण


जिल्ह्यातील उद्योगाद्वारे सी.एस. आर फंडातुन गरजुना किटचे वितरण 

दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुर जिल्ह्यातील मोठ्या उद्योगाद्वारे सीएसआर फंडा तुन जिल्ह्यातील गरजू असलेल्या 3000 किटचे वितरण करण्यात येत आहे या किट अंतर्गत गहू, तांदूळ, दाळ, तेल ई चे वितरण करण्यात येत आहे याविषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील उद्योगाने आपल्या परिसरात असलेल्या 10 ते 15 गावाना दत्तक घेतले आहेत मात्र त्या गावच्या नागरिकांपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात किट न पोहोचल्यामुळे संबंधित गावातील नागरिकामध्ये रोष निर्माण झाला आहे यामुळे आपले नैतिक कर्तव्य म्हणून या परिसरात असलेल्या उद्योगाने सम्बंधित गावातील नागरिकांना किट उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधि व विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातुन गरजू नागरिकांना किटचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध उद्योगानी मुख्यमंत्री सहायता निधि व जिल्हाधिकारी सहायता निधीत या आणिबानी च्या स्थितीत रक्कम व चेक द्वारे मदत जमा करून या कठीन प्रसंगी देशवासियांची सेवा करावी.
         तसेच जिल्ह्यात असलेले अनेक उद्योगात कार्यरत असलेल्या स्थायी व अस्थायी अशा कामगार बंधु द्वारे आपल्या एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री साहयता निधीत देण्यात येणार असून लवकरच सदर निधि जिल्हाधिकार्यांना सुपुर्द करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही व्यक्ति उपाशी पोटी झोपु नये यासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्था व विविध संघटनेद्वारे जिल्ह्यातील गरजू नागरिकांच्या भोजनाचे वितरण करण्यात येत आहे याशिवाय कोरोना या जीवघेण्या विषाणुजन्य आजाराशी लढा देण्यासाठी तत्पऱ असलेल्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ यांचे सुरक्षात्मक साहित्य व रुग्णासाठी लागणाऱ्या वेंटिलेटर यांची शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती कामगार नेते व माजी खासदार श्री नरेशबाबू पुगलिया यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments