कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात भाजी विक्रेत्यानी देंनदिनी वसूली बंद करण्याची मागणी


कोरोना पार्श्वभूमीवर बल्लारपुरात भाजी विक्रेत्यानी देंनदिनी वसूली बंद करण्याची मागणी

बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : सद्यास्थितित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग ग्रस्त असून अनेक देशात या गम्भीर आजाराने धुमाकुळ घातला आहे आपल्या भारत देशाचा विचार केला तर 22 मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाउन झाले असून 14 एप्रिल नंतरही देशात लॉकडाउन ची परिस्थिति कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे जीवनावश्यक गरजा अंतर्गत येणारा भाजीपाला हा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक गरज आहे त्यासाठी निदान लॉकडाउन चा कार्यकाळ संपूण परिस्थिति पूर्वपदावर येई पर्यंत तरी बल्लारपुर शहरात भाजीपाला विक्रेते यांचेकडून करण्यात येणारी दैनन्दिनी वसूली बंद करण्याची मागणी येथील भाजीपाला विक्रेत्यानी केली आहे ज्या ठिकाणी नागरिकाना भाजीपाला मिळण्यात अड़चन येवू नये या अनुषंगाने जिल्ह्यातील वाहनावरील टोल टैक्स काही काळासाठी रदद् करण्यात आले आहेत त्याच धरतीवर बल्लारपुर शहरातील भाजीपाला विक्रेत्याची दैनन्दिन वसूली निदान लॉकडाउन संपेपर्यंत व परिस्थिती पूर्वपदावर येई पर्यंत स्थगित करण्यात यावी अशी मागणी बल्लारपुर येथील भाजी विक्रेत्यानी केली आहे याविषयी काही भाजीपाला विक्रेत्याना विचारले असता लॉकडाउन मुळे नागरिक पाहिजे त्या प्रमाणात येत नाही त्यामुळे भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला असून आमची भाजीपाला ला लावण्यात आलेली मुळ कीमत ही निघत नाही शिवाय दैनन्दिन वसूली ही नित्यनेमाची आहे त्यामुळे किरकोल भाजीपाला विक्रेत्याना अनेक प्रश्न आहेत तरी काही काळा पूरती दैनंदिन वसूली बंद करण्याची मागणी भाजीपाला विक्रेत्यानी केली आहे.

Post a Comment

0 Comments