14 एप्रिल नंतरही महाराष्ट्रात लॉकडाउन कायम राहणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा
दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : कोरोना या जीवघेण्या विषाणुने संपूर्ण जगभरात धूमाकूल घातला असताना महाराष्ट्रातील मुंबई पुणे व अवघ्या महाराष्ट्राला आपल्या कवेत घेतले आहे केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यन्त लॉकडाउन ची घोषणा केली होती.
मात्र आज झालेल्या देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्री व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत झालेल्या चर्चे नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोरोना सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाउन कायम ठेवनार असल्याची घोषणा केली.
प्रसारमाध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे म्हणालेत की या दरम्यान महाराष्ट्र तील बहुसंख्य नागरिकांची कोरोना टेस्ट घेण्याचा प्रयत्न राहिल शिवाय या लोकडाउन दरम्यान जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा कायम ठेवला जाईल कृषिवर आधारित असलेल्या घटकाना परवानगी देण्यात येईल तसेच कोरोना सारख्या आजारावर मात करण्यासाठी सर्व महाराष्ट्रीयन बांधवानी एकदिलाने काम करून त्यावर मात करावी तसेच प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाद्वारे देण्यात येणाऱ्या निर्देशाचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.




0 Comments