वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदात्याना सेनेटाइजर चे वाटप
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयात रुग्णाना रक्ताची गरज भासत असते या विषयाच्या अनुषंगाने व दि. ०७ एप्रिल रोजी वनविकास महामंडलाचे माजी अध्यक्ष मा. चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या सेवाभावी कार्याला समोर नेत बल्लारपुर नगर परिषदेचे अध्यक्ष मा. हरीश शर्मा यांनी बाबूजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरातील 90 रक्तदात्याना स्वहस्ते सेनेटाइजर चे वाटप केले.
या रक्तदान शिबिरात मुख्यतः सामूहिक दूरी बाबत विशेष लक्ष ठेवण्यात आले होते एका वेळेला केवल 5 रक्तदाता अशा प्रकारे क्रमाक्रमाने ऐकून 90 रक्तदात्यानी रक्तदान केले त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळाचे वाटप, गोरगरीबाना धान्याचे वाटप, नगर सुरक्षा दलाच्या टीम ला मॉस्क व हैंडग्लब्स चे वाटप, रैन बसेरा मध्ये फूड पेकेट चे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्याक्रमाच्या आयोजनात प्रामुख्याने शहर अध्यक्ष श्री काशीनाथ सिंह, महामंत्री श्री मनीष पांडे, श्री विश्वजितसिह चंदेल, समीर केने, छगन जूलमें, मुन्ना ठाकुर, अरविंद दुबे, राजुभाऊ दासरवार, रणंजय सिंह, राजू दारी, येल्लया दासरफ़, देवेंद्र वाटकर, अरुण भटारकर, सतीश कनकम, घनश्याम बुरडकर, सलीम अहमद, नफीस अन्सारी, सचिन उमरे, नीरज झाड़े, विरेना बदावत, श्रीकांत आंबेकर, हरी लंका, सुरेंद्र खड़का, मनीष पोलशेट्टीवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ई चे अमूल्य सहकार्य लाभले.





0 Comments