बल्लारपुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 39 वाहनचालकावर कारवाई


बल्लारपुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 39 वाहनचालकावर कारवाई
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): कोरोना सारख्या विषाणुजन्य आजारावर शासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांना वारंवार सूचना देवूनही अनेक नागरिक अनावश्यक कामाने विनाकारण बाहेर पड़त असतात या नागरिकावर बल्लारपुर पोलिस विभागाद्वारे कारवाई करण्यात आली.
  मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल 2020 ला पोलिस निरीक्षक श्री. शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वस्ती विभागातील गोल पुल तसेच नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी प्रभावी नाकाबंदी राबविन्यात आली व कोरोना या विषाणुजन्य आजाराच्या संदर्भाने चंद्रपुर जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक व विनाकारण बाहेर निघणाऱ्या पादचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण 21 इसमावर भादंवी कलम 188, साथरोग प्रतिबंधक कायदा, कलम 3 व आपत्ति व्यवस्थापन कायदा कलम 51 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
  तर 19 वाहन डिटेन करण्यात आली तर 20 अशी एकूण 39 वाहनचालकावर मोटर वाहन कायदा अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये बल्लारपुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री शिवलाल भगत, सहायक पोलिस निरीक्षक श्री गोंदके साहेब, श्री जोशी साहेब, श्री गायकवाड़ साहेब, श्री मुलाणी तसेच  पोलिस वाहतूक कर्मचारी निलेश माळवे, महेंद्र कातोरे, वासुदेव टेकाम, परमेश्र्वर डोईफाडे, दिनकर पोले व विलास काबली सहभाग घेतला यावेळी नागरिकानी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच शासकीय नियमाचे व आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री भगत यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments