RCERT पॉलिटेक्निकच्या ९८ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स इन्क्युबेशन सेंटरला औद्योगिक भेट
◾ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमेशन व इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांनी घेतली प्रत्यक्ष माहिती
चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT) पॉलिटेक्निक, चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे डॉ. अनिल चिताडे आणि पॉलिटेक्निकचे प्रा. रोशन रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्षाच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथील इन्क्युबेशन सेंटर – टाटा मोटर्स येथे एकदिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीत प्रथम वर्षाच्या डिप्लोमाच्या ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या औद्योगिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती देणे, वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्राशी संबंध जोडणे तसेच नवोन्मेष, इन्क्युबेशन आणि उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना इनोव्हेशन डिझाईन, प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट (PLM), मेकॅट्रॉनिक्स व इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग व रोबोटिक्स सिम्युलेशन, अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इलेक्ट्रिक व हायब्रिड व्हेईकल, ऑटोनॉमस-कनेक्टेड-अँड-इलेक्ट्रिफाइड व्हेईकल, इनोव्हेशन डिझाईन अँड इन्क्युबेशन, व्हॅल्यू इंजिनिअरिंग अँड बेंचमार्किंग तसेच प्रॉडक्ट व्हॅलिडेशन अँड अॅनालिसिस या विविध प्रयोगशाळा व क्षेत्रांची माहिती देण्यात आली.
इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित प्रशिक्षण बोर्ड, रिव्हर्स कॅमेरा व पार्किंग सिस्टीम, औद्योगिक रोबोट वर्क सेल, कन्व्हेयर-आधारित असेंब्ली लाइन तसेच विविध यंत्रसामग्रीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहन तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, नवोन्मेष आणि उद्योजकता यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच औद्योगिक शिस्त, सुरक्षितता आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
या औद्योगिक भेटीचे समन्वयक प्रा. आशिष भरडकर होते. त्यांच्यासह प्रा. प्रकाश सोनडवले, प्रा. गौरी बुराडकर, प्रा. पूजा भोमा आणि प्रा. आशिष गोंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही भेट यशस्वी करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर – टाटा मोटर्स, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.









0 Comments