आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हंसराज अहीर यांचा घुग्घुस येथे योगाभ्यास

 


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हंसराज अहीर यांचा घुग्घुस येथे योगाभ्यास


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून रोजी शिव मंदिर, घुग्घूस येथे आयोजित योग कार्यक्रमात पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सहभागी होऊन योगाभ्यास केला. यावेळी त्यांनी योगाचे महत्व अधोरेखित करत नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले.

                योग ही केवळ शारीरिक व्यायाम पध्दती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग आहे. पंतप्रधान माननिय नरेंद्र मोदीजींच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून आज संपूर्ण जग योगाचे महत्व स्वीकारत आहे. निरोगी भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने नियमित योगाभ्यास करावा असे हंसराज अहीर यांनी सांगितले.

                याप्रसंगी अहीर यांच्या हस्ते योगगुरू मारोती पिंपळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संजय तिवारी, रामपाल वर्मा, निरीक्षण तांड्रा, गणेश पिंपळकर, प्रदीप खेवले, निळकंठ गोहने, रत्नाकर झाडे, लखन हिकरे, सुधीर गुडेलीवार, अंबिका सिंग, सुदामा यादव, रामावध यादव, संतोष मिश्रा, संतोष वर्मा, विष्णू यादव, तारकेश्वर यादव, राजेश गिरडकर, संतोष जुनघरे, सीताराम चैरसिया, नंदकिशोर यादव, सागर तालापेल्ली, चंद्रकांत पालावार, सागर गेडाम, दिपक मिशाळ, विशाल दामेर, समिय्या कटकम, पूनम तिवारी, गौतम यादव, सुनील यादव, सीनु कोट्टुरी, रीतेश यादव, गजानन उनमाले, परमानंद चौबे, रामकरण निशाद, धर्मेंद्र यादव, शंकर वांढरे, प्रकाश  गाठले, दिनेश पिंपळकर, गोकुल येडूलवार, मुसाराम बावणे, विलास हिरादेवे, राकेश तिवारी, अमरजीत यादव, उमेश यादव, राजकुमार गोडसेलवार, बृजेश सिंग, स्वप्निल वाढई, शंभु प्रजापती, बाला पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने योगसाधक उपस्थित होते.

                कार्यक्रमात विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले असून उपस्थितांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




Post a Comment

0 Comments