राजूरा तालुक्यातील धोपटाळा कॉलनीतील महिलेची निर्घृण हत्या

 




राजूरा तालुक्यातील धोपटाळा कॉलनीतील महिलेची निर्घृण हत्या 

 ◾ गळा चिरून निर्घृण हत्या  

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा तालुक्यातील धोपटाळा कॉलनी परिसरात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शीतल रणधीर कुंभारे (३५) असे मृत महिलेचे नाव असून त्या काही दिवसांपासून माहेरी वास्तव्यास होत्या.

प्राप्त माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते सकाळी १० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. धोपटाळा कॉलनी येथील आपल्या आईच्या WCL क्वॉर्टर क्रमांक ५२/२ मध्ये शीतल कुंभारे या आपल्या १२ वर्षीय मुलगी निरीक्षा हिच्यासोबत घरी होत्या. दरम्यान घरातील इतर सदस्य देवदर्शनासाठी बाहेर गेले होते.

शुक्रवारी सकाळी मुलगी उठल्यानंतर आई दिसून न आल्याने तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर घरात शोध घेतला असता एका खोलीत शीतल कुंभारे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. तसेच हत्याऱ्याने मृत महिलेचा POCO कंपनीचा मोबाईल फोनही सोबत घेऊन गेला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख करीत आहेत.

या  घटनेमुळे धोपटाळा कॉलनीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.




Post a Comment

0 Comments