बल्लारपुर रेल्वे स्टेशन समोरील खुला पटांगणावरुन ३ वर्षे बालकांचा चोरी प्रकरणी
◾अपहरण केलेल्या ३ वर्षे वयाचे बालकाचा २० तासाच्या आत शोध घेवुन पालकांच्या ताब्यात देण्यात चंद्रपुर पोलीसांना यश
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक २८/०२/२०२६ रोजी २७ वर्षीय महिला फिर्यादी यांनी पोलीस ठाणे बल्लारपुर येथे रिपोर्ट दिली की, ते व त्यांचे पती हे बल्लारपुर रेल्वे स्टेशन परिसरात राहत असुन त्या परीसरात कचरा गोळा करून त्याव्दारे आपली उपजिवीका चालवितात.
दिनांक २७/०२/२०२६ रोजी रात्रौ फिर्यादी ही तिचा ३ वर्ष वयाचा मुलगा व परिवारासह बल्लारपुर रेल्वे स्टेशन समोरील खुला पटांगणात झोपी गेले असता रात्रौ दरम्यान त्याचा ३ वर्षे वयाचा मुलाचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले अशी तकार दिल्या वरुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा.क़. ३२३/२०२६ कलम १३७ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर मुम्मका सुदर्शन यांनी तपासात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पोलीस ठाणे बल्लारपुर यांचे ०७ वेगवेगळी पथके गठीत केली. १०० हुन अधिक सिसिटिव्ही फुटेजचे तपासणी करुन मिळालेल्या तांत्रिक पुराव्याचे आधारे व एका स्थानीक सजग नागरिकांचे सतर्कतेमुळे आरोपी निष्पन्न करून मंचेरियल तेलंगणा राज्य येथे पथके रवाना करण्यात आली.
आरोपी नामे - १) ऐलक्का रायसिंग बुद्दे वय ६० वर्ष, २) राणी विनोदकुमार पसनोटी वय ३० वर्ष, ३) संगिता व्यंकटेश पानंगणती वय ४० वर्ष, सर्व राहणार मंचेरियल, तेलंगाणा राज्य व ईतर ०२ पुरुष ईसम यांचेसोबत बल्लारपुर रेल्वे स्टेशन येथे आले व सदर मुलावर पाळत ठेवली व त्या मुलाचे आईवडील झोपले असतांना त्या मुलाचे अपहरण करुन एका चार चाकी वाहनात विक्री करण्यासाठी घेवुन गेले. व त्या ०३ वर्ष वयाचे मुलास आरोपी क़ ४) सातक्का चंद्रया करेरे वय ५० वर्ष व ५) लावण्या कुमारस्वामी कोणा वय ३४ वर्ष राहणार मंथनी, मंचेरियल जिल्हा मंचेरियल राज्य तेलंगाणा यांना ३,५०,००० रुपयात विकले होते.
सदर पाचही आरोपीत महिलांना मंचेरियल येथिल स्थानीक पोलीसाचें मदत घेवुन अटक केले असुन सदर गुन्हयात पाहीजे असलेले ०२ पुरुष इसमांचा शोध सुरु आहे. सदर आरोपीकडुन अपह्त ०३ वर्षीचा मुलास ताब्यात घेवुन त्याचे आई-वडीलांचे ताब्यात देण्यात आले आहे.
मुलाची चोरी करुन त्याची विक्री करणारे टोळीने आणखी काही ठिकाणी अश्याच प्रकारचे गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. गौरव कायंदेपाटील, परीविक्षाधिन सहा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा उपविभाग चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बल्लारपुर यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, बलराम झाडोकार, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि. अभिषेक जंगमवार, पोउपनि. विक्की लोखंडे पोउपनि. सुनिल गौरकार, सफौ. णनराज करकाडे, पोहवा. संतोष दांडेकर, पोहवा. मोहन निशाद, पोहवा. प्रविण निकोडे, पोहवा. किशोर वैरागडे, पोहवा./अजय बागेसर, पोहवा./इम्रान खान, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. गजानन मडावी, पोशि/हिरालाल गुप्ता, पो.अं. शेखर माथनकर, पोशि/शंशाक बदामवार, पो.अं. किशोर वाकाटे, पो.अं. वैभव गाडगे, पो.अं. नरेंद्र वाकडे, महिला पो. अंमलदार अनिता नायडु, पोअं. रिषभ बारसिंगे, मिलीद टेकाम व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पो.अं. अनिमेश भोंगळे यांनी केली असुन तेलंगणा राज्य मंचेरियल पोलीस दलातील मा. श्री. ए. भास्कर, पोलीस उपायुक्त, मा. श्री. आर. प्रकाश, सहा. पोलीस उपायुक्त, श्री. एस. प्रमोद राव, पोलीस निरीक्षक, पोहवा. ई. उपेंद्र, पोहवा. जे. दशरथ, पोशी. एम. लक्ष्मण, पोशी. आर. तिरुपती, पोशी. महेश बेबी, पोशी. एम. लक्ष्मण यांनी आरोपी ताब्यात घेण्यासाठी चंद्रपुर पोलीस पथकाला मोलाची केली आहे.
जाहिर आवाहन - चंद्रपूर पोलीसातर्फ चंद्रपूर जिल्हयात " ऑपरेशन मुस्कान" हा भारत सरकारचा आणि राज्य सरकारचा एक महत्वपुर्ण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश हरविलेले/पळविलेले बालकांचा/मुलींचा शोध घेणे आहे. तरी सर्व नागरिकांनी अवाहन करण्यात येत की, आपले परिसरात अशा बालकाचे संबंधाने कोणतीही माहिती असल्यास डायल ११२ अथवा ७८८७८९०१०० या मोबाईल कंमाकावर कळवावे. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.








0 Comments