नगर परिषद राजुरा तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

 


नगर परिषद राजुरा तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

 राजुरा( राज्य रिपोर्टर ) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी तेवत राहावी आणि आपल्या इतिहासातील हुतात्म्यांचे  स्मरण व्हावे यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषद कार्यालय राजुरा तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली."हर घर तिरंगा अभियान " संपूर्ण नगर परिषद राजुरा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन करण्यात आले. 

शासनाच्या सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. नगर परिषद राजुरा तर्फे महिला बचत गटामार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने चंद्रपूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री संपत खलाटे सर उपविभागीय अधिकारी राजुरा, हरीश गाडे तहसीलदार राजुरा सूर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा, भिंगारदिवे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचविने अपेक्षित आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभुळकर प्रशासकीय अधिकारी नगर परिषद राजुरा यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूर्यकांत पिदूरकर सर मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांनी तर आभार संकेत नंदवनशी पाणीपुरवठा अभियंता यांनी मांडले. कार्यक्रमाचे उद्घाटना प्रसंगी राजूरातील बहुसंख्य नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करिता आदित्य खापणे विद्युत अभियंता, उपेंद्र धामणगे कर निरीक्षक, अशवीन कुमार भोई लेखापाल, अभिनंदन काळे सर रचना सहाय्यक, रवींद्र जामुनकर सर स्थापत्य अभियंता, प्रीतम कडसे,सनफ जोशी ,अक्षय सूर्यवंशी आदीसह नगर परिषद कार्यालय राजुरा येथिल सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments