अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक प्रकरणी ट्रक्टर जप्त, 2 व्यक्ती विरुद्ध वनगुन्हा दाखल केल्याचे वृत्त

 



अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक प्रकरणी ट्रक्टर जप्त, 2 व्यक्ती विरुद्ध वनगुन्हा दाखल केल्याचे वृत्त 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र बल्हारशाह मधील केम बिटातील कक्ष क्र. 574 मध्ये दिनांक 04. ऑगस्ट 2022 ला सायंकाळी 05.00 वा . दरम्यान सरकारी जंगलातील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक करतांना ट्रॅक्टर क्रमांक MH  34 L 5883 व MH  34 V  4741 जप्त करण्यात आली. 

भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ड) व (ग), 41, 52 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक. 08954/223831 दिनांक 04 ऑगस्ट 2022 नुसार आरोपी 1) नरेश बाबुलाल बहुरीया व 2) गणेश बाबुलाल बहुरीया, रा. बल्हारशाह यांचे नावे वनगुन्हा जारी करण्यात आला. जप्त करण्यात आलेली दोन नमुद ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बल्हारशाह येथे जमा करण्यात आले असुन श्री. नरेश रा.भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, यांचे मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास श्री. कोमल घुगलोत, क्षेत्र सहाय्यक बल्हारशाह श्री.आर.आर. शिवनकर  वनरक्षक केम करीत आहे. अशी माहीती ( नरेश रा.भोवरे ) वनपरिक्षेत्र अधिकारि बल्लारशाह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



Post a Comment

0 Comments