बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे बुरुज अतिपाऊसा मुळे कोसळले
◾कोणतीही जिवीत वा वित्त हानी नाही
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह येथील असलेल्या प्राचीन गोंडकालीन किल्ला अजूनही आपल्या ऐतीहासिकतेची साक्ष देत उभा आहे तसेच मा.आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे सौदर्यीकरण कऱण्यात येत आहे. मात्र मागील 5 दिवसापासून सुरू असलेल्या अति पाऊसामुळे किल्ला नगरातील गोविंदबाबा मंदिर लगत असलेला किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग काल रात्रीच्या सुमारास कोसळला आहे यामुळे कोणतीही जिवीत वा वित्त हानी झाली नसली तरी यामुळे परिसरातील नागरिकांचं आवागमन बंद झालं आहे. विशेष म्हणजे या परिसरात गोविंदबाबा नावाचं देवस्थान असून नागरिकांच्या सहकार्यातून काही दिवसापूर्वी सौदर्यीकरण कऱण्यात आले होते. या ऐतिहासिक असलेल्या गोंडकालीन किल्ल्याची देखरेख पुरातत्व विभागामार्फत होत असून लवकरच पुरातत्व विभागाची चमू घटनास्थळाला भेट देणार असल्याची माहीती आहे. तसेच स्थानिक प्रशासन सुध्दा या घटनास्थळाला भेट देणार आहे. विशेष म्हणजे बल्लारशाह येथील ऐतिहासिक किल्ल्याचे आणखी नुकसान होण्यापेक्षा किल्ल्याचे संवर्धन कऱण्यात यावे व परिसरातील नागरिकांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी बल्लारपूर च्या वतीने मा. तहसीलदार बल्लारपूर यांना देण्यात आले आहे.




0 Comments