एक दिवसीय महिला धम्म शिबीर संपन्न
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : त्रिरत्न बौध्द महासंघ शाखा बल्लारपूर चे वतीने आषाढी पौर्णिमा निमित्ताने गुरुवारला एकदिवसीय महिलांचे धम्मशिबिर भिक्षु निवास पाली विद्यालय बौद्ध विहार येथे संपन्न झाले.
धम्ममित्र रजनीताई हस्ते ( आघात ) यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्व व तीन रत्न बुध्द, धम्म,संघ, याविषयी दोन सत्रांमधे महिलांना अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तत्पूर्वी धम्ममित्र भास्कर भगत यांनी मैत्री भावना ध्यान याविषयीची माहिती दिली व ध्यान सराव करून घेतला. दुसर्या सत्रात मैत्री भावनेचा प्रत्यक्ष सराव घेतला तेव्हा सर्वच महिला अत्यंत भावुक झाल्यात. सूत्र संचालन धम्ममित्र संध्या गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वनिता नगराले यानी केले. विशेष म्हणजे भर पावसातही अनेक महिला उपस्थित होत्या. धम्मपालन गाथेने संगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपत कोरडे, प्रणित गावंडे , वर्षा वैद्य यांनी परिश्रम घेतले.





0 Comments