बल्लारशाह वरून मुंबई करीता ( व्हाया वर्धा ) गाडी त्वरीत सुरुकरा - हंसराजजी अहिर

 




बल्लारशाह वरून मुंबई करीता ( व्हाया वर्धा )  गाडी त्वरीत सुरुकरा - हंसराजजी अहिर

◾नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह वरून सुरु करणे, पुणे गाडी आठवड्यातून ३ दिवस बल्लारशाह वरून सुरु करणे याबाबत चर्चा 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. हंसराजजी अहिर यांनी  मध्य रेल्वे चे महाप्रबंधक श्री. अनिल कुमार लाहोटी जी यांची  रेल सुविधा संघर्ष समिती चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. यावेळी बल्लारशाह वरून मुंबई करीता ( व्हाया वर्धा )  गाडी त्वरीत सुरु करणे, नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह वरून सुरु करणे, पुणे गाडी आठवड्यातून ३ दिवस बल्लारशाह वरून सुरु करणे याबाबत चर्चा केली. बल्लारशाह येथे  २४ डब्यांच्या पिटलाईन मुळे  भविष्यात बल्लारशाह वरून थेट गाड्या सोडण्यासाठी कार्यक्रम आखणी करण्याच्या सूचनाही अहिर यांनी यावेळी  केली. चंद्रपूर ते चांदा फोर्ट चे सर्व्हे व तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही यावेळी केल्या. चंद्रपूर व बल्लारशाह रेल्वे स्थानकासंबंधी अन्य विविध समस्यांबाबत ही चर्चा केली.



Post a Comment

0 Comments