मित्राच्या पोटात खुपसली बिअरची बाटली

 



 

मित्राच्या पोटात खुपसली बिअरची बाटली 

◾पैसे न दिल्याचा राग 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : माणसाच्या आयुष्यात कोणती वेळ कशी येईल याचा काही नेम नाही पुरातन काळापासून मित्रत्वाचे गोडवे गायले जात असायचे इतकंच नव्हे तर १० पुस्तकांपेक्षा एक दिशा दाखवणारा मित्रच चांगला असाही उल्लेख केला जात असतो पण तोच मित्र केवळ दारूच्या एका घोटासाठी जीवावर उठत असेल तर काय स्थिती असेल.

       बल्लारपूर शहरातील टेकडी परिसरातील बिरसा मुंडा चौक परिसरात गुरुवारच्या सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान एक घटना घडली यानुसार तीन मित्र नामे शाहरुख शेरखान पठाण (२६), नीरज महेंद्र यादव (२५), व अंकित ताराचंद रामटेके (२१) यांनी मनसोक्तपणे बिअर पिली  तसेच पुन्हा बिअर पिण्यासाठी पैसे दिण्यास नकार दिल्यामुळे दुसऱ्या मित्रानेच पुढे असलेली बिअरची बाटली फोडून शाहरुख शेरखान पठाण या मित्राच्या पोटात खुपसली या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी इतर दोन व्यक्ती विरुध्द भांदवि च्या कलम ३०७, ३४ नुसार अटक केली असून या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.




Post a Comment

0 Comments