पंकज इंग्लिश मेडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे नैपुण्य.

 पंकज इंग्लिश मेडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे नैपुण्य. 

जळगाव/चोपडा(राज्य रिपोर्टर) :   येथील पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोरोना च्या कालखंडात लोकमत समाचार आयोजित शैक्षणिक स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात सहभाग घेऊन नैपुण्य मिळवले आहे. यामध्ये तेजस्विनी गणेश बेहरे या विद्यार्थिनीने फॅन्सी ड्रेस तसेच डान्स कॉम्पिटिशन मध्ये तर अमय बधू कोळी व मनस्वी नितिन पाटील या विद्यार्थ्याने स्पीच म्हणजेच भाषण प्रकारात आपला सहभाग घेतला. त्यांना अनुक्रमे मेडल तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.सहभाग तसेच निवडीबद्दल संस्थेचे संचालक पंकज सुरेश बोरोले, अविनाश राणे तसेच प्राचार्य नीता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


Post a Comment

0 Comments