वीज बिल माफ करा आणि लोकांचे वीज कनेक्शन त्वरित खंडित करणे थांबवा, अन्यथा आम आदमी पार्टी जनआंदोलन छेडेल

 

वीज बिल माफ करा आणि लोकांचे वीज कनेक्शन त्वरित खंडित करणे थांबवा, अन्यथा आम आदमी पार्टी जनआंदोलन छेडेल

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे 02/07/2021 रोजी शहराध्यक्ष - रविकुमार शंकर पुपलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष - सुनील मुसाळे, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत, मा. जिल्हा अधिकारी मार्फ़त मा. उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मा. मुख्य अभियंता MSEB चंद्रपूर आणि उपमुख्य अभियंता MSEB बल्लारपूर यांना अल्टीमेटम देण्यात आले, या कोरोना (Covid -19) महामारीच्या काळात लोक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत, सर्वसामान्य जानतेचे शोषण करू नका, महाराष्ट्रातील लोक राज्य सरकारकडून छोटीसी मदत्तिची अपेक्षा करीत आहेत. महागठबंधन सरकारला आग्रह आहे, कोरोना कालावधीचे बिल माफ करा, तसेच राज्य सरकारचा निर्णय येईपर्यंत घरांचे वीज कनेक्शन खंडित करू नका, असे MSEB सर्व मुख्यअधिकाऱ्यांना आवाहन. सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, जर कनेक्शन खंडित करने, पाच दिवसात थांबवले नाही तर आम आदमी पार्टी, बल्लारपुर, बल्लारपुरात जनआंदोलन छेडेल, जनतेला मदत देण्यासाठी आंदोलन तीव्र करत राहील आणि यासाठी महाराष्ट्र राज्य महागठबंधन सरकार आणि  MSEB जबाबदार असतील.! निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष- सुनील मुसळे, जिल्हा-कोषाध्यक्ष- भिवराज सोनी, जिल्हा विधि सलाहगार- ऍड. किशोर पुसलवार, शहर अध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष- अफज़ल अली, शहर सचिव- ऍड. पवन वैगडे, शहर कोषाध्यक्ष- आसिफ शेख, शहर संघटन मंत्री- निलेश जाधव, किसन आघाडी प्रमुख- सुदाकर गेडाम, समशेरसिंग चौहान, राकेश वडसकर, शेखर तेलरंडे, प्रशांत गद्दाला, कृष्णा मिश्रा, राजू अर्नाकोंडा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments