कोरोना काळात सेवा देणाऱ्या कामगारांचा नगरसेवकांकडून सत्कार
बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सक्रिय पणे कार्य करून प्रसंगी आपल्या जीवाचे रान करून जनसामान्य नागरिकांची निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई कामगारांचा प्रभाग क्र. 6 चे नगरसेवक श्री. स्वामी राजू रायबरम यांनी आपल्या निवासस्थानी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला.
तसेच सफाई कामगारांच्या सेवेत सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले तसेच तज्ञांच्या अंदाजानुसार जर निकट भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यावर मात करण्यास सफाई कामगार सदैव तत्पर राहतील असे कामगारांना आव्हान केले.
यावेळी उपस्थित श्रीकांत आंबेकर, रोहित गुप्ता, हुसेन खान, सुधाकर तावड़े , तिरुपति मंतनवार, मुबारकाली, मोहमद निसार, अनीश अहमद, मोहमद कैफ, सहजाद अली, रितेश मुरमड़े, बोइनी राजम्मा, विरु जामबूढे, लक्ष्मी रायबराम यांनी या कार्यक्रमला यशस्वी केले.







0 Comments