सिटीपीएस येथील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा


सिटीपीएस येथील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे यांच्याकडे मागणी 
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : येथील औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर प्रकल्पग्रतांनी  १२ मार्च २०२० पासून आमरण उपोषण केले होते. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने महानिर्मिती प्रशासनाने १६ मार्च २०२० ला लेखीस्वरूपात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतु अद्याप देखील त्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या नसल्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुंबई येथे ऊर्जा राज्यमंती प्राजक्तजी तनपुरे यांची भेट घेऊन या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची त्यांनी केली. 

                          ज्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीचे प्रगत कुशल प्रशिक्षणास तीन  वर्षे व त्यापेक्षा जास्त वर्षे झालेले आणि प्रशिक्षण घेत आहेत अशा प्रशिक्षणार्थींची आपलयच वर्कशॉपमध्ये ट्रेडटेस्ट घेऊन तृतीय श्रेणी या महानिर्मितीच्या रिक्त पदावर त्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावे, ज्या प्रकारे महानिर्मितीच्या प्रत्येक टी. पी. एस मधून वीज कर्मचारी सेवा निवृत्ती होत आहे, त्या रिक्त जागेवर तीन वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांना ट्रेडटेस्ट घेऊन सरळसेवेत सामावून घ्यावे, ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रगत कुशल प्रशिक्षण १ वर्ष ते ४ वर्ष दरम्यान चालू आहे. त्या प्रशिक्षणार्थीचे वेतन वाढ करण्यात यावी तसेच भविष्य निर्वाह निधी योजना व मेडिक्लेम योजना लागू करण्यात याव्यात, ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रगत कुशल प्रशिक्षण १ वर्ष व त्यापेक्षा जास्त वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले परंतु प्रशिक्षण घेत असतांना महानिर्मितीच्या जाचक अटीमुळे वय वर्ष ४५ बाद झाले त्या प्रगतकुशल प्रशिक्षणार्थीला त्यांचे प्रमाणपत्र जमा करून चतुर्थ श्रेणी म्हणून कायमस्वरूपी नोकरीत सामावून त्या प्रशिक्षणार्थीचे भविष्य निर्वाह निधी योजना व मेडिक्लेम योजनेचा लाभ द्यावा, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या निर्वाह भत्ताधारक मय्यत झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नौकरी देण्यात यावी, या मागण्या पूर्ण करून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना न्याय द्यावा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे यांना केली आहे.

Post a Comment

0 Comments