चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्रीमती मिताली शेठी यांची नियुक्ती
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असलेले श्री. राहुल कर्डीले यांच्या जागी अमरावतीच्या सहायक जिल्हाधिकारी व धारणी येथिल प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती. मिताली शेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने आज राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आज दिनांक 30 जून 2021 ला या संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहे यानुसार श्री. प्रवीण परदेशी यांची अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग मुंबई येथे झाली आहे, तर श्री. रणजित कुमार यांची मुख्य सचिवालय मुंबई येथे बदली झाली आहे, श्री. वी.पी.फड यांची सदस्य सचिव, मराठवाडा विकास मंडळ औरंगाबाद याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे, डॉ.पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे, श्री. राहुल गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद, यांची नियुक्ती करण्यात आली आहे, श्री. मनुज जिंदल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्रीमती. मिताली शेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असलेले श्री. राहुल कर्डीले यांच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.



0 Comments