बल्लारपुर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवाना उदर निर्वाह किटचे वाटप

बल्लारपुर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवाना उदर निर्वाह किटचे वाटप
दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना या जीवघण्या विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करून लॉकडाउन करण्यात आले यामुळे बल्लारपुर शहर लॉकडाउन असल्याने शहरातील दुर्बल घटकातील लोक अत्यंत अडचणीना तोंड देत आहे दिव्यांग बांधव हे या घटकातील महत्वाचा भाग असल्याने शासनाच्या परिपत्रकानुसार दिव्यांगाना 5 % खर्च राखीव असतो त्यामुळे
 बल्लारपुर नगर परिषदेने दिव्यांग बांधवासाठी राखीव असलेल्या निधितुन शहरातील सर्व दिव्यांग बांधवाना उदरनिर्वाह किट वाटप करण्याचा मनोदय व्यक्त करून शहरातील एकूण 525 दिव्यांग बांधवाना याचा लाभ दिला जाणार आहे या अनुषंगाने दि. 08 एप्रिल 2020 ला नगर परिषद सभागृहात प्रतिनिधिक स्वरुपात 5 दिव्यांग लाभार्थयाना किट वाटप करण्यात आली या किट अंतर्गत (3 किलो तांदूळ, 3 किलो पीठ, 1 लीटर तेल, 100 ग्राम मिरची पावडर, 50ग्राम हळद, 1 मीठ पुडा, अर्धा किलो बेसन, अर्धा किलो तुवरदाल, डेटॉल साबन, मॉस्क व हैंडवाश) देण्यात येत आहे उर्वरित सर्व लाभार्थयाना घरपोच किट वाटप करण्यात येणार आहे. या उदरनिर्वाह किट च्या वाटप प्रसंगी श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपुर, मा. सौ मिना चौधरी उपाध्यक्ष न.प.बल्लारपुर, मा.विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, श्री सचिन जाधव कांग्रेस गट नेते, श्री विनोद यादव गतनेते शिवसेना यांचे सह सर्व सभापति, नगरसेवक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments