श्रीमती मेनका गांधीनी घेतली बल्लारपुर च्या कार्यकर्तीची दखल


श्रीमती मेनका गांधीनी घेतली बल्लारपुर च्या कार्यकर्तीची दखल
दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): संपूर्ण जग कोरोनाच्या विषाणुजन्य आजारापासुन ग्रस्त असताना मानव समाज आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी धड़पड़त असताना जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनासाठी धड़पड़ करावी लागते अशा स्थितीत बल्लारपुर शहरातील एक सामान्य कार्यकर्ती मागील 21 दिवसांपासून दररोज मुकया प्राण्यांची सेवा करतांना दिसून येत आहे.
 बल्लारपुर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डमध्ये राहत असलेली श्रुती लोणारे आपल्या पती सह मागील 24 मार्च 2020 लॉकडाउन झाल्यापासुन मुक़्या जनावराना आपल्या घरी जेवन बनवून सगळी कड़े भ्रमंती करुन जिथे मुके जनावर दिसताच त्यांना भोजन देत असतात ज्या ठिकाणी प्रत्येक मानव समाज आपल्या जगण्यासाठी धडपडत आहे त्याच ठिकाणी श्रुती लोणारे व त्यांच्या पतीचे कार्य वाखाण्याजोगे आहे व याच कार्याची दखल मा.केंद्रीय मंत्री श्रीमती मेनका गांधी यांनी दखल घेतली व या विशेष सामाजिक कार्या संदर्भात बल्लारपुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. विपिन मुद्दा यांना स्वतः मोबाईल वर विचारपुस करून या सामाजिक कार्यामध्ये मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.          
  या अनुषंगाने आज रविवार 12 एप्रिल 2020 ला मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपुर, मा.विपिन मुद्दा, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, मा.जयवंत काटकर, मा.अभिजीत मोटघरे उपमुख्याधिकारी बल्लारपुर, मा. राजेश बांगर लेखापाल न.प.बल्लारपुर, माजी नगरसेवक श्री देवेंद्र जी आर्य, यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन 60 किलो गहू व 60 किलो तांदूळ ची मदत केली व सर्व नागरिकांना व पशु व प्राणी प्रेमिना आवाहन केले आहे की श्रुती लोणारे - 8149594443 आणि त्यांचे पती श्री राकेश चिकाटे - 9112435955 यांना मदत करून मुक़्या प्राण्याना मदत करण्याचे आवाहन नगर परिषद बल्लारपुर च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments