मोहसीन भाई जव्हेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न







मोहसीन भाई जव्हेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न         

          



बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बुधवार ला मोहसीन भाई जव्हेरी कन्या महाविद्यालय बल्लारपूर येथे कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲड. इब्राहिमजी जव्हेरी मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या ॲड. वनिता लालवानी तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ. अभय बुटले मंचावर उपस्थित होते,  प्रा. संजय वरवटकर व कॉलेजच्या इन्चार्ज प्रा. रुबीना खान सुद्धा मंचावर उपस्थित होत्या.

 ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये होणाऱ्या गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर उपाययोजना म्हणून, ॲड. वनिता लालवाणी मैडम नी कायद्याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ.अभय बुटले सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन संपूर्ण प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका विना झाडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सुनीता चौधरी नी केले.

Post a Comment

0 Comments