बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव(पोडे)-विसापूर मार्गावर दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळं घडला अपघात एकाचा मृत्यू



बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव(पोडे)-विसापूर मार्गावर दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळं घडला अपघात एकाचा मृत्यू 

◾WCL कामगार  भगतसिंग वॉर्ड,बल्लारपूर येथील रहिवासी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील वेकोलीत कामगार असलेले व भगतसिंग वॉर्ड येथील रहिवासी असलेले हेमंत राजन्ना पत्तीवर वय 27 वर्षे हे काही कामासाठी चंद्रपूरला गेले होते आपलं कार्य पुर्ण करून आज शनिवारला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान नांदगाव(पोडे)-विसापूर मार्गाने परत येत असतांना दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळं विसापूर गावालगतच्या हनुमान मंदिर जवळच्या पुलाला जबर धडक दिली. या अपघातात हेमंत पत्तीवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या संदर्भातील अधिक माहितीनुसार सदर युवक नांदगाव(पोडे) वरुन दुचाकी क्रं MH 34 BX 2288 ने विसापूर मार्गाने बल्लारपूर कडे परत येत असतांना सदर अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळं व अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं हेमंतचा घटनास्थळीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे सदर दुचाकी ही नांदगाव येथील वेकोलि वसाहतीत राहणाऱ्या श्री. दत्ता वाघमारे यांची असल्याची माहिती आहे. सदर अपघाताची माहिती विसापूर पोलिस चौकीत कळताच जमादार जिवन पाल व शिवराम वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास मा. उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद रासकर करीत आहे.

Post a Comment

0 Comments