बल्लारपुर येथिल तालुका क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे विधीवत शुभारंभ

 


बल्लारपुर येथिल तालुका क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे विधीवत  शुभारंभ

◾क्रिडा संकुलाच्या माध्यमातुन परिश्रम घेत खेडाळुंनी क्रिडा क्षेत्रात भरारी घ्यावी - हरीश शर्मा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : माजी अर्थ नियोजन व वनमंत्री (म.रा.) मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तालुका स्तरावर क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे करीता बल्लारपुर येथे अथक प्रयत्नाने क्रिडा संकुल उभारले.

या क्रिडा संकुलाचे रितसर उदघाटन सुध्दा झाले असतांनाही वैष्वीक स्तरावर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून क्रिडा संकुलातील जलतरण तलाव बंद होते.आजच्या घडीला कोरोणाची साथ मंदावली असल्याने दिनांक 6/7/ 2022 रोजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.हरिशजी शर्मा यांच्या शुभहस्ते या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे विधिवत शुभारंभ करून जलतरण पट्टुं करिता खुले करण्यात आले.यावेळी बल्लारपूरचे तहसीलदार मा.श्री.संजय रांईचवार,श्री.किशोर पंदीलवार ,श्री.सुनिलसिंग बैस,श्री.सदानंद बुध्दार्थी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments