75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पर्वावर कारवा - बल्लारपूर रस्त्यालगतच्या रोपवनात वनमहोत्सवाचे आयोजन
◾वनमहोत्सवाच्या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभणार
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आपल्या भारत मातेच्या 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सन 2022 मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासन वन विभाग मार्फत राज्यातील निवडक 75 रोपवन स्थळावर समांरभपुर्वक VC Link व्दारे उद्या दिनांक 08 जुलै 2022 ला कारवा-बल्लारशाह रस्ता लगत असलेल्या मिश्र रोपवन 2022 क्षेत्र 35.00 हैं. मध्ये भव्य वृक्ष लागवड करुन वनमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. चंदनसिह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ ( म.रा. ), श्री.हरिश शर्मा माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपुर, श्री. प्रकाश लोणकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत्त चंद्रपुर, श्रीमती. स्वेता बोड्डु उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर, श्री.संजय राईंचलवार तहसिलदार बल्लारपुर, श्री.विजय देवळीकर मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, श्री. क्षिकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक, श्री.किरणकुमार धनवाडे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपुर तसेच गुरुनान विज्ञान महाविद्यालय बल्हारपुर व बालाजी हायस्कुल बामणी बल्लारपुर येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. तरी या वनमहोत्सव 2022 मध्ये बल्हारशाह शहरातील नागरीकांनी, सामाजिक संस्थांनी पत्रकार व व्यापारी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होवुन हे वनमहोत्सव यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे. विद्यार्थ्यांमध्ये व जनसामान्यामध्ये वना विषयी आवड निर्माण व्हावी व वृक्ष लागवडीची चळवळ उभी व्हावी हा प्रमुख हेतु ठेवुन वनमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी या कार्याक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होवुन सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान श्री. नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी केले आहे.




0 Comments