भाजपा ओबीसी मोर्चा राज्यस्तरीय बैठकीस संबोधित - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर




भाजपा ओबीसी मोर्चा राज्यस्तरीय बैठकीस संबोधित - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक व संवैधानिक हक्कासाठी भरीव कार्य केले असून हे सरकार ओबीसींचे तारणहार आहे. 

भाजपा ओबीसी मोर्चा ओबीसींच्या न्याय अधिकारासाठी  लढा देणारे समर्पित संघटन असून ओबीसी बांधवांच्या न्यायासाठी प्रखर लढा देण्यास या मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे  असे आवाहन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी  महिला व युवक संपर्क प्रमुखांच्या राज्यस्तरीय बैठकीस संबोधित करताना केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आयोजित या बैठकीस खा. संगमलालजी गुप्ता, राष्ट्रीय महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, आ. प्रशांत ठाकूर, संजय गाते, मनोज भुजबळ आदि मान्यवरांसह अन्य वरिष्ठ पदाधिकारी तसेच संपर्क प्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments