चंद्रपूर शहरातील बाबुपेठ उड्डाणपुलावर अपघात झाल्याचे वृत्त ; एक गंभीर जखमी
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया कडुन बल्लारपूर कडे जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी 11:00 वाजताच्या दरम्यान दुचाकीचा अपघात घडला असल्याचे वृत्त आहे या अपघातात सदर युवक गंभीर जखमी असून सदर युवकाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. या पूर्वी डिसेम्बर 2021 मध्ये याच बाबुपेठ उड्डाण पुलावर मद्यपी युवकांनी चारचाकी वाहन सुसाट वेगाने चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं वाहन पुलावरून डी.एड कॉलेज च्या दिशेला खाली कोसळले होते. या अपघातात काही युवकाचा दुःखद मृत्यू झाला होता. मात्र या अपघातात तुटलेले कठडे जैसे थे स्थितीतच होते. या घटनेची पुनरावृत्ती आज 11 जूलैला झाली असून एका दुचाकी चा या उड्डाण पुलावर अपघात घडला असून या अपघातात तो गंभीर जखमी असून त्यांचेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.







0 Comments