▪️ निधन वार्ता ▪️
प्रा. मालती कवाडे ( ताडे ) यांचं आज सोमवारला दुःखद निधन
◾बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कला-वाणिज्य महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील डॉ. झाकीर हुसेन वार्ड येथील निवासी असलेल्या माजी नगरसेविका व सेवानिवृत्त प्राध्यापिका मालती कवाडे ( ताडे ) मॅडम यांचं आज वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे.
प्रा.मालती कवाडे ( ताडे ) मॅडम या बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कला-वाणिज्य महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणुन कार्यरत होत्या त्यांच्या मागर्दर्शनात अनेक विद्यार्थी घडले असुन आज त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या विद्यार्थी वर्गावर शोककळा पसरली असुन त्यांचेवर उद्या मंगळवार ला अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आहे.






0 Comments