धक्कादायक ! महिला पोलीस शिपायाची आत्महत्या
गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) : गडचिरोली येथे पोलीस वसाहतीत राहत असलेली प्रणाली काटकर वय-३५ हिने काल रात्री १०:३० च्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली याबाबतच्या अधिक माहितीनुसार मृतक महिला पोलीस शिपाई ही मागील २ वर्षांपासून गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत होती त्यांचे लग्न पोलीस खात्यातच पोलीस शिपाई असलेल्या संदीप पराते यांचे सोबत २ वर्षांपूर्वीच झाले होते ते सुध्दा गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत सूत्राच्या माहितीनुसार मृतक महिला पोलीस शिपाई ही संदीप पराते यांची दुसरी पत्नी असून या दोघात नेहमी वाद होत असल्याची माहिती आहे व २९ जानेवारीला सुध्दा कौटुंबिक वाद झाल्याने मृत महिला पोलीस शिपायाने टोकाची भूमिका घेऊन विष प्राशन केल्याची माहिती सूत्र सांगतात विष प्राशन केल्याची माहिती कळताच संदीप पराते यांनी पत्नीला लगेच गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलविले उपचार सुरू असतांना रुग्णालयातील डॉक्टरांनी रात्री १०:३० च्या दरम्यान सदर महिलेला मृत घोषित केले. सदर प्रकरणाची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आज ३० जानेवारीला सदर महिलेचे शवविच्छेदन करण्यात येत असून या घटनेमुळे पोलीस वसाहतीत खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास अरविंद कुमार कातलाम पोलीस निरीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पूनम गोऱ्हे करीत आहेत.


0 Comments