दुचाकी अपघातात कोठारीचे माजी सरपंच यांचा घटनास्थळीच मृत्यू तर १ जखमी
कोठारी ( राज्य रिपोर्टर ) : गोंडपीपरी येथील आपली नित्याची कामे आटोपून आपल्या स्वगावी परत येत असतांना राज्य महामार्गावरील असलेल्या करंजी गावाजवळ लोखंडी डिवायडर ला धडक दिल्यामुळे कोठारी येथील माजी सरपंच रविंद्र खाडे यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असल्याचं वृत्त आहे. रविंद्र खाडे हे आपल्या दुचाकीने गोंडपीपरी वरून काम आटोपून परत येत असताना सदर अपघात घडला या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुसरा किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. सदर अपघाताची माहिती मिळतात कोठारी व गोंडपीपरी पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचली व त्यांनी जखमींना गोडपीपरी च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी प्राथमिक तपासणी अंती माजी सरपंचाना मृत घोषित केले या अपघाताची वार्ता कोठारी गावात येऊन धळकताच कोठारी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहे.


0 Comments